मुसळधार पावसामुळे रस्त्याला आले नद्यांचे स्वरूप ढगफुटी सदृश्य पाऊस…

0
slider_4552

पुणे :

रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण परिसरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्त्याला नद्यांची स्वरूप प्राप्त झाले होते.

पाषाण परिसरात जोरदार पाऊस
पाषाण परिसरात जोरदार पाऊस झाला त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साठले, घरात पाणी शिरले. विशेषतः पाषाण सुस रस्ता चिदानंद सोसायटी समोर, सुतारवाडी स्मशानभूमी जवळ, शनी मंदिर NDA रोड पाषाण परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले.

विठ्ठलनगर व लोंढे वस्ती परिसरात घरात पाणी शिरले होते. सुस रोड येथे चालू असलेल्या फुटपाथच्या कामामुळे व छत्रपती शिवाजी महाराज चौकात एल अँड टी च्या वतीने चालू असलेल्या कामामुळे या त्रासात अजून भर पडली व नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले.
यामुळे प्रचंड मोठी वाहतूक कोंडी देखील झाली.

बाणेर रोडवर आयडीबीआय बँक, हॉटेल भैरवी, बाणेर फाटा पुढे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आले असल्याने या ठिकाणीही वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागले.

सुसगाव महादेव नगर येथे रस्त्याला नदीचे रूप आले होते. यामुळे या परिसरातील रहिवाशी नागरिकांचा शहराशी शी संपर्क तुटला होता. परिसरातील अनेक नागरिक कामासाठी बाहेर जातात त्यांना देखील घरी जाण्यासाठी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. महादेव नगर परिसरातील नागरिक महानगरपालिकेकडे रस्ता व्यवस्थित करण्यासाठी वारंवार मागणी करत आहेत. परंतु महानगरपालिकेकडे निधी नसल्याचे सांगून रस्ता करण्यास दिरंगाई करण्यात येत आहे.

See also  शिवम सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त "नवजात बालक किट अमर्यादित योजना" तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न.