सुतारवाडी :
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमीत्ताने माध्यमिक विदयालय सुतारवाडी येथील इ.10 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यासाठी व कौतुकाची थाप देण्यासाठी कार्यक्रम विद्यालयात संपन्न झाला.
याबद्दल माहिती देताना भाजपा युवा नेते शिवम सुतार म्हणाले की, माध्यमिक विद्यालय सुतारवाडी येथील मुले होतकरू व अभ्यासू आहेत. त्यांनी यश संपादन केले याचा सर्व ग्रामस्थांना अभिमान आहे. त्यांनी मिळविलेल्या यशाचे कौतुक करणे गरजेचे आहे. म्हणून त्यांचा सत्कार करत आहे. भविष्यात शिक्षण घेताना येणाऱ्या प्रत्येक अडचणी वेळी मोठा भाऊ या नात्याने सर्वांच्या पाठीशी उभा राहील. असे आश्वासन विद्यार्थ्यांना देत आहे. यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.
समस्त सुतारवाडी ग्रामस्थाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब सुतार, बाळासाहेब सुतार, मारुती कोकाटे, सोनबाभाऊ सुतार, परमेश्वर सुतार, भानुभाऊ रनपिसे, राजाभाऊ रनपिसे, प्रसाद सुतार, राहुल बहिरमे, शुभम ठाकुर, सोमनाथ गायकवाड तसेच विद्यालयातील विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षक आणि कर्मचारी तसेच पालक उपस्थित होते.
यश संपादन केलेले प्रथम तीन विदयार्थी
प्रथम क्रमांक – कु. धनश्री तानाजी लोंढे (86%)
द्वितीय क्रमांक – कु. रितीशा घोडेराव (82%)
तृतीय क्रमांक – कु. पुजा चव्हाण (75%)