भारताच्या भवानी देवीने राष्ट्रकुल तलवारबाजी चॅम्पिअनशिप मध्ये मिळविले सुवर्णपदक

0
slider_4552

लंडन :

भारताच्या भवानी देवीने राष्ट्रकुल तलवारबाजी चॅम्पिअनशिप मध्ये सुवर्णपदक जिंकत विजेतेपद राखले. जागतिक क्रमवारीत बेचाळिसाव्या स्थानावर असलेल्या भवानी देवीने ह्या चॅम्पियनशिप मध्ये दुसरे सिडींग मिळालेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडू वेरॉनिक वेसिलेवा वर १५-१० अशी मात केली.

भवानी देवीसाठी ह्या वर्षाची सुरवात इंस्तंबूल मध्ये झालेल्या वर्ल्ड कप पासून झाली ज्यात ती २३ व्या स्थानावर राहिली. त्यानंतर जुलै महिन्यात कैरो मध्ये झालेल्या जगातील चॅम्पियनशिप मध्ये तिला दुसऱ्या फेरीत पराभवाला तोंड द्यावे लागले. ही राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धा ही तिने ह्या वर्षात सहभाग घेतलेली दहावी जागतिक स्पर्धा होती. ह्या विजयानंतर भवानी देवी म्हणाली, “ही अंतिम फेरी कठीण होती. पण मी ह्या वर्षी भारतासाठी आणखी एक सुवर्णपदक मिळवू शकले ह्याचा मला आनंद वाटतो.”

तिच्या ह्या यशाबद्दल बोलताना केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू म्हणले, “नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये तालवारबाजीचा समावेश नव्हता. पण समांतरपणे लंडन मध्ये झालेल्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले. हे तिचे ह्या स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक आहे. ह्याच स्पर्धेच्या मागील हंगामातसुद्धा तिने सुवर्णपदकाची कमाई केली होती. अभिनंदन भवानी!”

२०२१ मध्ये झालेल्या टोकियो ऑलम्पिक साठी पात्र ठरणारी ती पहिली तालवारबाज ठरली होती. भारतात तलवारबाजीचा खेळ रुजण्यासाठी ती मिळवत असलेले यश नक्कीच परिणामकरार ठरेल अशी आशा आहे.

See also  विराट कोहलीने भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडलं