औंध :
गुरुवार दिनांक २४/०३/२०२२ रोजी युवाशक्ती औंधरोड व यार्दी वस्ती विकास प्रकल्प, युथ चाप्टर आयोजित वार्षिक विज्ञान मेळाव्यात विजेते ठरलेल्या विज्ञान उपक्रमांचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.
यावेळी मेळाव्यातील सहभागी मुलांचे कौतुक करताना सुखाई प्रतिष्ठानचे संस्थापक/अध्यक्ष अविनाश कांबळे म्हणाले की, वार्षिक विज्ञान मेळाव्या मधील विद्यार्थ्यांनी अतिशय हुशारीने आपल्या विचारांनी वेगवेगळ्या पद्धतीने विविध कल्पनांचा वापर करत विविध वस्तू बनविल्या. मेळाव्याचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या विचारांना वाव देण्याचे काम आयोजकांनी केले. विद्यार्थ्यांनी देखील अतिशय चांगला प्रतिसाद देत या मेळाव्यात सहभाग घेतला आणि बक्षिसे मिळवली त्याबद्दल त्यांचे कौतुक वाटते. लहान मुलांची विचार शक्ती फार मोठी असते त्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना सुचतात. या कल्पनांना असे व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे.
या कार्यक्रमास सुखाई प्रतिष्ठान चे संस्थापक/अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक अविनाश कांबळे व यार्दी वस्ती विकास प्रकल्प, युवक विकास कार्यक्रमाचे प्रमुख सचिन अडसरे सर व युवाशक्ती संस्थापक अध्यक्ष रोहित आगळे यांनी प्रमुख उपस्थिती दाखवली.
विजेत्या संघांचे नाव ऐकण्यासाठी सर्वजण खूप उत्सुक होते. सर्व विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी व त्यांना शिकवणाऱ्या सर्व युवाशक्ती सभासदांनी आपले मनोगत व्यक्त केले.