महापालिका निवडणुकीसाठी केलेली प्रभाग रचना रद्द…

0
slider_4552

मुंबई :

महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगर पंचायती यांच्या क्षेत्राची प्रभागांमध्ये विभागणी करण्याची आणि त्यांच्या हद्दी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली असेल किया पूर्ण केली असेल तर ती प्रक्रिया रद्द करण्यात आली असल्याचे मानण्यात येईल, असे एका शासकीय अध्यादेशात म्हटले आहे.

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह १४ महानगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. ओबीसी आरक्षण निश्चित करण्याचा प्रश्न लांबला आहे. राज्य सरकारने नुकताच अध्यादेश काढून मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सर्व अधिकार आपल्या ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे पुण्यासह चौदा महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली प्रभाग रचनाही रद्द करण्यात आली आहे, तसा आदेश नुकताच पालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

राज्य सरकारने मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत अधिनियमात सुधारणा केल्या आहेत. आता सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकारला निवडणुका, आरक्षण आणि निवडणूक प्रक्रियेचे नियोजन करण्याचे सर्व अधिकार आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने आता महापालिका निवडणुकीसाठी केलेली प्रभाग रचना रद्द केली आहे. तसा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला.

See also  शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट