बालेवाडी :
बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन आणि नवचैतन्य जेष्ठ नागरिक संघ बालेवाडी यांनी आज संयुक्तपणे शिवजयंती साजरी केली. संघाचे अध्यक्ष गणपतराव बालवडकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. मिलिंद जोशीराव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध तंत्रावर व्याख्यान दिले. अफजलखानाचा वध आणि आग्रा येथुन सुटका करून घेतांना महाराजांनी योग्य आणि काटेकोर नियोजन कसे केले याबद्दल ची माहिती त्यांनी दिली.
मोबाईल गेम पेक्षा आपल्या मुलांना महाराजांचे चरित्राबद्दल सांगा असं प्रतिपादन त्यांनी केले. गणपतराव बालवडकर यांनी फेडरेशनच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले व शिवाजी महाराजांचे जीवन आजदेखील कसं मार्गदर्शन करते याचे दाखले दिले.
प्रास्ताविक भाषणात ॲड.माशाळकर यांनी दोन्ही संस्थांच्या कार्याची ओळख करून दिली.फेडरेशन चेअरमन रमेश रोकडे यांनी शिवाजी महाराजांचे संपूर्ण भारतभूमीसाठीचं योगदान याचे महत्त्व विशद केले. फेडरेशनसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र कसं मार्गदर्शक ठरले आहे याची माहिती दिली.
बालेवाडीतील अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते.
सुत्रसंचलन सुदर्शन जगदाळे यांनी केले तर ॲड. इंद्रजित कुळकर्णी यांनी आभार मानले.
विराज सस्ते या दहा वर्षांच्या मुलाने खणखणीत आवाजात अफजलखान वधाचा पोवाडा सादर केला. उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले. अनेक विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक व संतांचे पोशाख करून आपल्या संस्कृतीची ओळख करून दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोरेश्वर बालवडकर, डी डी सिंग, ॲड. परशुराम तारे, अस्मिता करंदीकर, शुभांगी चपाटे, श्रद्धा कामटे, राहूल बाळसराफ शकिल सलाटी, विजय गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.