बालेवाडी :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रभाग क्रमांक 9 डॉ. सागर बालवडकर यांच्या वतीने कायदा क्षेत्रातील वकिलांच्या योगदानाबद्दल वकिल दिनाच्या निमित्ताने त्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम बालेवाडी येथील एसकेपी कॅम्पस येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लिगल सेल शहराध्यक्ष ॲड. लक्ष्मण राणे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक 9 बाणेर बालेवाडी सुस महाळुंगे च्या वतीने घेण्यात येणारा वकिलांचा सन्मान हा कार्यक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. परिसरातील शिक्षक, डॉक्टर, विद्यार्थी अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गेले अनेक वर्ष करण्यात येत आहे. फक्त निवडणुका डोळ्या समोर न ठेवता गेले अनेक वर्ष हा सन्मान सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बाणेर बालेवाडी येथे आयोजित करण्यात येत आहे हे कौतुकास्पद आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहर उपाध्यक्ष डॉ. सागर बालवडकर म्हणाले की भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून वकील दिवस साजरा केला जातो. आज समाजामध्ये कायद्याच्या क्षेत्रातील वकील हे आपली समाजाप्रती बांधीलकी जपत काम करत आहेत. आज प्रत्येक व्यक्तीला घर घेण्यापासून तर प्रत्येक कायदेशीर बाबी साठी वकिलांची गरज पडते. कोरोना महामारी मध्ये देखील वकिलांनी आपली सामाजिक बांधिलकी म्हणून विविध सामाजिक उपक्रम पार पाडले. कायदेशीर बाबींवर बरोबरच वकिलांमार्फत चालू असलेले हे सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहेत. म्हणून आज वकीलांप्रती आदर व्यक्त करताना त्यांचा गौरव करत आहे
बाणेर-बालेवाडी-सुस व महाळुंगे या परिसरातील वकिल या कार्यक्रमास उपस्थित होते. ॲड.कालिदास वढणे (न्यायाधिश) ॲड.लक्ष्मण राणे (पुणे शहर लिगल सेल) यांच्या हस्ते सर्वांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष डाॅ. सागर बालवडकर, गणपतराव बालवडकर, प्रा. रूपाली बालवडकर, नितीन कळमकर, पुनम विधाते, समीर चांदेरे, विशाल विधाते, ॲड दिलीप शेलार, ॲड. पांडुरंग थोरवे, मनोज बालवडकर, सुषमा ताम्हाणे तसेच परिसरातील वकील यावेळी उपस्थित होते.
यावेळी नितीन कळमकर यांनी सूत्रसंचालन केले, प्रास्तविक पूनम विधाते यांनी केले. तर आभार मनोज बालवडकर यांनी मानले.