नवी दिल्ली :
29.10.2021 रोजी शहरी विकास मंत्रालय, केंद्र शासन तर्फे दिला जाणार ‘उत्कृष्ट शहरी वाहतूक मेट्रो रेल विथ द बेस्ट मल्टिमोडल इंटेग्रेशन ‘ पुरस्कार यावर्षी महामेट्रोला देण्यात आला आहे. महामेट्रो पुणे व नागपूर येथे द मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम करत आहे. देशभरामध्ये 17 ठिकाणी मेट्रो प्रकल्पाचे काम चालू आहे. या सर्व मेट्रो प्रकल्पांमध्ये महामेट्रो सर्वोत्तम ठरली असून त्यामुळेच हा पुरस्कार मेट्रोला मिळाला आहे.
महामेट्रोने मल्टिमोडल ईंटेग्रेशन साठी विशेष प्रयत्न करून पुणे आणि नागपूर येथे मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब उभारत आहे. महा मेट्रो ला मिळालेला पुरस्कार हा मेट्रो रेल्वेचे बेस्ट मल्टिमोडल इंटेग्रीशन या प्रकारात मिळाला आहे. आज दि. २९.१०.२०२१ रोजी नवी दिल्ली येथे हरिदीप सिंग पुरी मंत्री शहरी विकास मंत्रालय भारत सरकार यांच्या हस्ते डॉ. ब्रिजेश दीक्षित यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
याप्रांसगी महामेट्रोने वेगवेगळ्या मेट्रो स्थानकांमध्ये इतर शहरी वाहतूक व्यवस्थेशी समन्वय केल्याचा कामाचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. महामेट्रोने स्वारगेट, शिवाजीनगर, सिविल कोर्ट, फ, गेवाडी, पुणे रेल्वे स्थानक येथे मल्टिमोडल ई टेग्रेशन करण्यात येणार आहे.
याप्रसंगी महामेटोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हटले आहे की ‘महामेट्रो राबवत असलेल्या मेट्रो प्रकल्पामंध्ये मल्टिमोडल इंटेग्रेशन साठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. आजचा हा पुरस्कार महामेट्रोच्या प्रयत्नांना अधोरेखित करणारा आहे. महामेट्रो पुणे आणि नागपूर शहरात ‘उत्कृष्ट शहरी वाहतूक व्यवस्था देण्यासाठी सतत प्रयत्न करीत राहील.