लूज बॉल आला की फटका मारायचाच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
slider_4552

मुंबई :

‘लूज बॉल आला की फटका मारायचाच. तो क्रिकेटमध्ये असो की किंवा राजकारणात असो. पण फटका मारताना विकेटही टाकायची नाही’ असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या कार्यक्रमात जोरदार बॅटिंग केली.

तर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारत-पाकिस्तान सामन्याच्या वादावरून नाराजी व्यक्त केली. वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्या नावे “द सुनील गावस्कर हॉस्पिटॅलिटी बॉक्स” आणि माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या नावाने स्टेडियममधील नॉर्थ स्टँडचे “दिलीप वेंगसरकर स्टँड” असं नामकरण करण्यात आलं. यावेळी बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्रिकेटच्या आठवणींना उजाळा देत राजकीय टोलेबाजीही केली. भेटा LIVER KING ला!

20 वर्षांपासून जगतोय आदिमानवासारखं जीवन, खातो कच्चं मांस इकडच्या बाजूंनी बॉलरने टाकलेले स्विंग चांगले कळतात. त्यामुळं समोरचे स्विंग चांगले कळतात. मी आता मैदानात उतरलोय, तेही जगविख्यात संघातून. माझी आठवण फक्त इथल्या धावपट्टीसोबत आहे क्रिकेट जनतेच्या रक्तात भिनलंय.

मलाही वाटायचं क्रिकेटर व्हावं. पण होवू शकलो नाही, अशी खंत उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली. तसंच, ‘लूज बॉल आला की फटका मारायचाच. तो क्रिकेटमध्ये असो की किंवा राजकारणात असो.

पण फटका मारताना विकेटही टाकायची नाही’ असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. खेळाडूंवरील आरोप अशोभनीय -शरद पवार तर ‘उत्तम क्रिकेटर हा उत्तम प्रशासक असेलच असं नाही. पण याला माधव मंत्री अपवाद होते. चांगल्या मॅचेस पाहण्यासाठी मी पुण्याहून इथं यायचो.

ई स्टँडला बसणाऱ्या लोकांना सर्वाधिक क्रिकेट समजते. गरवारे आणि एमसीएचा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत गेला. मी गरवारेकडून व मनोहर जोशी एमसीएकडून प्रतिनिधी होतो. पण दोघांनी मिळून हा वाद सोडवला, असं म्हणत पवारांनी आठवणींना उजाळा दिला.

‘अल्गोरिदम आणि इतर प्रक्रियांची माहिती द्या’,सरकारने Facebook कडे मागितली माहिती द.आफ्रिका वर्ल्ड कपसाठी कप्तानपदाचा शोध सुरू होता. सचिन तेंडुलकरने महेंद्रसिंग धोनीचे कप्तानपदासाठी नाव सुचवले आणि तो यशस्वितेचा विश्वासही दिला. सचिनला ही जबाबदारी घेण्याची संधी होती. परंतु, स्वत:चा विचार न करता त्यांनी क्रिकेटचा विचार करत धोनीचे नाव सुचवले’ असा किस्साही पवारांनी सांगितला.

See also  राज्यातील गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धनासाठी सुकाणू समितीचे गठण

‘अलीकडे झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यात आपल्या संघाला पराभव आला. पण पाकविरोधात हरल्यानंतर काही खेळांडूविरोधात प्रतिक्रिया उमटल्या. त्या अशोभनीय होत्या. उद्याची मॅच आपण नक्की जिंकू, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला.