नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या वतीने दिवाळी सरंजाम वितरण

0

बाणेर :

सर्व सामान्य माणसांची दिवाळी गोड व्हावी म्हणून नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक ९ बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे गावातील २५०० गोरगरीब नागरिकांना सरंजाम वितरण करण्यात आले.

भाजप पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले की, गेली पाच वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी या प्रभागांमध्ये झोकून देऊन काम केले आहे. त्यांनी केलेल्या कामांमुळे आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो. संकट काळामध्ये गोरगरिबांना मदत करणारे यांचे समोर नतमस्तक होणारे गणेश कळमकर आणि नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या पाठीशी नागरिकांनी ठामपणे उभे राहावे. विकासा बरोबरच नागरिकांची दिवाळी गोड करण्याचे काम दोघांनी केले आहे.

कार्यक्रमाचे आयोजक भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर प्रस्तावना करताना सांगितले की, गेली पंधरा वर्षांमध्ये कोणी काय काम केले हे आम्ही विचारणार नाही. पण गेल्या पाच वर्षांमध्ये आम्ही काय काम केले हे आम्ही नागरीकांना सांगणार आहे. अडीअडचणीच्या काळामध्ये नागरिकांना समस्या सोडविण्याकरिता आमचे जनसंपर्क कार्यालय नेहमी खुले आहे. विविध विकास कामा सोबत नागरिकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून सरंजाम वाटप करण्यात येत आहे.

कार्यक्रमाच्या आयोजिका नगरसेविका ज्योती कळमकर यांनी सांगितले की, गोरगरिबांच्या मदतीला धावून जाता आले, त्यांना मदत करता आली याचा आनंद आहे. गेल्या पाच वर्षांत विविध विकास कामातून आम्हीं नागरिकांपर्यंत पोचलो आहोत. गोरगरीब नागरिकांची दिवाळी गोड करण्याच्या दृष्टिने सरंजाम वाटप करण्यात येत आहे.

यावेळी भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक,भाजपा कोथरूड अध्यक्ष पुनीत जोशी, नगरसेविका स्वप्नाली सायकर, भाजपा ओबीसी उपाध्यक्ष प्रल्हाद सायकर, भाजपा सहकार आघाडी प्रभारी प्रकाश बालवडकर, भाजपा नेते लहू बालवडकर, भाजपा प्रभाग अध्यक्षा उमा गाडगीळ, शिवम बालवडकर, प्रभाग ९ महिला अध्यक्ष अस्मिता करंदीकर, रीना सोमय्या, उज्वला साबळे, मीना पारगावकर, सुरेश सायकर, मल्हारी मामा, सुखदेव मामा, अनिल कळमकर, बाळकृष्ण कळमकर, सुनील कळमकर, संदीप कळमकर, प्रशांत कळमकर, लखन कळमकर, अभिषेक कळमकर, हेमंत कळमकर, भरत कळमकर, सुरेश कळमकर, प्रमोद कळमकर, संदीप वाडकर, सुधीर ताम्हाणे, राहुल पारखे, सागर ताम्हाणे, महादेव सायकर, नितीन सायकर, गणेश चाकणकर, निलेश सायकर, प्रशांत म्हेत्रे, सुहास पाटील, रवींद्र सायकर, किरण सायकर, प्रानेश सायकर, महेंद्र सायकर, किरण सायकर, सतीश बागल, प्रकाश कदम, महादेव साळवणे, आकाश क्षीरसागर, श्याम काळे आदि मान्यवर व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

See also  नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी "सॅनिटायझ विथ सनी" उपक्रम...