श्री तुकाई विकास सेवा ट्रस्ट द्वारे नवरात्र उत्सवाचे आयोजन..!

0

बाणेर :

पुणे शहराच्या पश्चिम भागात बानेश्वर या पांडव कालीन लेणीच्या वर, बाणेर टेकडीवर वसलेली तुकाई देवी. याठिकाणी तुकाई मंदिर बांधण्यात आले असून नवरात्री उत्साहात मोठ्या उत्साहाने विविध उपक्रम राबवले जातात. दरवर्षी भक्ती भावनेने हजारो नागरिक या ठिकाणी दर्शनाला येतात.

या मंदिरातील मूर्तीचे स्वरूप वेगळे असून मातृ स्वरूपात देवी प्रसन्न झाल्याने, अष्टभुजा भवानी स्वरूपा ऐवजी वात्सल्य भावातील मूर्तीची स्थापना या मंदिरात आपल्याला पाहायला मिळते. देवी च्या शेजारी एक बालक उभा आहे, असा प्रकारची मूर्ती या ठिकाणी आपणास पहावयास मिळेल.

तुकाई मंदिराचा जीर्णोद्धार याला 2005 साली सुरुवात होऊन 2008 साली पुर्ण झाला. नवरात्री निमित्त देवीची वेगवेगळ्या रूपातील पूजा या ठिकाणी केली जाते. देवीच्या वेगवेगळ्या रूपातील सर्व सजावट महिला करतात. काली, लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा अशा वेगवेगळ्या रुपात देवीचे दर्शन भक्त घेतात.

श्री तुकाई विकास सेवा ट्रस्ट द्वारे भक्तांना सोयीसुविधा पुरविणे करता अनेक कामे केली गेली आहेत. तसेच टेकडी निसर्ग संपन्न व्हावी या उद्देशाने समपातळी चर खोदून विविध प्रकारची झाडे लावून जोपासली गेली आहे. स्थानिक नगरसेवकांकडून चांगल्या प्रकारची मदत मंदिर देवस्थानास नेहमीच होत आली आहे. लवकरच मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता अरुंद असल्याने, बाणेर मुख्य रस्त्यापासून टेकडीवरती जाण्याकरता पायऱ्या बनवण्याचे काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच मंदिराच्या दक्षिणेकडून चारचाकी वाहनांसाठी पक्क्या रस्त्यांचे नियोजन आहे.

 

गेल्या वर्षी कोवीड कालावधी मुळे मंदिर बंद होते. तर यावर्षी नवरात्री उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात असून, कोरोणाचे नियमांचे पालन करून भक्तांना मास्क व सॅनिटायझर वापरण्याच्या सूचना दिल्या जात आहे. यावर्षीही भक्तांना वेगवेगळ्या रुपात देवीचे दर्शन होणार आहे. सर्व भक्तांनी नियमांचे पालन करून दर्शनाचा लाभ घ्यावा अशी आवाहन श्री तुकाई विकास सेवा ट्रस्ट द्वारे करण्यात आले असल्याचे सुधीर कळमकर यांनी सांगितले. तुकाई मंदिराच्या विविध कामांमध्ये साहेबराव कळमकर, जगदीश कळमकर, सुधीर कळमकर, राजाराम कळमकर हे कार्यभार पहातात.

See also  पाषाण येथे अल्प उत्पन्न धारक नागरिकांसाठी झालेल्या मोफत लसीकरण मोहीमेस उत्स्फूर्त प्रतिसाद.

यावर्षी ची देवीची नऊरूपे :
1) केळीच्या पानांची सजावट
2) शिवाजी महाराजांस तलवार देताना तुळजाभवानी
3) नवग्रहामध्ये तुकाई माता
4) दाक्षिणात्य रुपात देवी
5) अर्धनारीनटेश्वर रूपातील पूजा
6) वैष्णव देवी स्वरूप
7) निसर्ग देवी स्वरूप
8) रथात विराजमान स्वरूप
9) हिमालयात विराजमान देवी