द बिंग यू संस्था व लहू बालवडकर सोशल वेल्फेअर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेली मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार..!

0

बालेवाडी :

जागतिक मानसिक आरोग्य दिवसानिमित्ताने द बिंग यू या संस्थेच्या संस्थापिका कोमल नरसिंघानी यांच्या पुढाकाराने आयोजित व लहु बालवडकर सोशल वेलफेअर यांच्या सहकार्याने, सर्व नागरिकांचे मानसिक आरोग्य उत्तम राहावे या हेतूने रॉयल रनभूमी बालेवाडी येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा चालणे, धावणे आणि सायकलिंग अश्या स्वरूपात पार पडली यावेळेस पुरुष, महिला तसेच लहान मुले अश्या तब्बल 250 नागरिकांनी यात आपला सहभाग नोंदविला. धावणे प्रकारात २१, १०, ५ कि.मी अंतर व लहान मुलांसाठी ३ कि.मी अंतर या स्पर्धेसाठी ठरवण्यात आले होते.

या स्पर्धेविषयी माहिती देताना युवा नेते लहू बालवडकर यांनी सांगितले की, चालणे धावणे आणि सायकलिंग करणे अशा वेगवेगळ्या स्वरूपात ही स्पर्धा झाली असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी अतिशय उत्साहात आनंदात भाग घेतला. अशा प्रकारच्या मॅरेथॉन स्पर्धेमुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. सर्वांमध्ये उत्साह निर्माण होतो. अशा स्पर्धा होत राहणे काळानुरूप गरजेचे आहे.

या मॅरेथॉन स्पर्धेला युवा नेते लहू बालवडकर, द बिंग यू च्या संस्थापिका कोमल नरसिंघानी, फूडस्ट्रॉंग प्रोटीन चे डायरेक्टर आवर्तन बोकील, देशात आणि परदेशात मॅरेथॉन स्पर्धा गाजवणारे, MCCIA चे डायरेक्टर प्रशांत गिरबाने, रशिया येथे 2015 साली झालेल्या IWAS स्पर्धेत रौप्य आणि कास्य पदकाची कमाई करणारा आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सुयश जाधव, मूछवाला सर, क्रीडा प्रशिक्षक जयदीप अंगरीवाल, फूडस्ट्रॉंग चे सार्थक वाणी, द पुणे ड्रम सर्कल चे मनीष सर आणि अमित सर, होला फूड्स च्या राधिका शर्मा, आपुलकी ट्रेडर्सचे नामदेव निकम, दादूस स्वीट्स चे रुशील सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या वेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते सहभागी खेळाडूंचे सन्मानपत्र देण्यात आले. या मॅरेथॉन स्पर्धे वेळी कोणत्याही सहभागी खेळाडूला काही इजा, दुखापत किंवा काही त्रास जाणवू लागल्यास तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सज्ज होती. स्पर्धा संपल्यानंतर सर्व खेळाडूंची डॅा.यश बहुलीकर (MD medicine and diabetologist and ICU incharge) आणि डॅा. सचिन गायकवाड याच्या माध्यमातून मोफत रक्तदाब तपासणी व शुगर तपासणी करण्यात आली.

See also  बाणेर-पाषाण टेकडीच्या पायथ्याशी बेकायदेशीररित्या राडारोडा टाकून पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी.