16 वर्षे 8 महिन्यांनी नाशिकफाटा ते राजगुरूनगर दरम्यानचे टोल बंद

0

पुणे :

तब्बल 16 वर्षे 8 महिन्यांनी नाशिकफाटा ते राजगुरूनगर दरम्यानचा टोल बंद करण्यात आला आहे. नाशिक महामार्गावर टोल वसुली करणारे चांडोली व मोशी येथील टोल नाके अखेर मुदत संपल्याने बंद करण्यात आले आहेत.

नाशिक फाटा ते राजगुरुनगर पर्यंतच्या तीस किलोमीटर अंतरादरम्यान दोन टोल नाके उभारण्यात आले होते. ते बंद झाल्याने नाशिक फाटा ते खेड पर्यंतचा रस्ता आता टोलमुक्त झाला आहे. शुक्रवारी रात्री बारा वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोशी व चांडोली येथील टोल वसुली बंद करण्यात आली.

नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा, नाशिकच्या गुन्ह्या प्रकरणी कारवाई न करण्याचे आदेश
नाक्यावर बसविण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक वसुली बूथ देखील बंद करण्यात आले आहेत. नाशिक फाटा ते राजगुरुनगर पर्यंतचा रस्ता गॅजेटनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे.

See also  पवार साहेबांचा वरदहस्त म्हणून सेनेचा मुख्यमंत्री : खासदार अमोल कोल्हे