लहू बालवडकर यांच्या कार्यात सेवाभावी वृत्ती दिसते : प्रवीण दरेकर

0

बालेवाडी :
बालेवाडी येथील भाजप नेते लहू बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भाजप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी लहू बालवडकर यांनी राबविलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती घेतली. एमपीएससी परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लहू बोलताना सांगितले की, लहू बालवडकर यांच्या कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्या कार्यात सेवाभावी वृत्ती दिसते. आरोग्य क्षेत्रामध्ये अतिशय चांगले काम त्यांनी केले. कोरोना काळामध्ये त्यांनी केलेल्या कामाचा आम्हाला अभिमान वाटत आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. वीस रुपयांमध्ये आरोग्यसेवा, गेली ७  वर्ष शेतकरी आठवडे बाजार प्रभागातील नागरिकांसाठी तसेच या भागातील विकलांग विधवा आणि गरीब गरजू लोकांसाठी एक चांगला असा उपक्रम नित्य पुण्य पर्ण एक वेळेचे जेवण घरपोच देत आहे असे विविध उपक्रम त्यांनी राबवत आहेत. या सेवाभावी वृत्तीचा विडा लहू बालवडकर यांनी उचलला आहे. त्याकरिता त्यांना लागेल ते मार्गदर्शन आणि मदत करून त्यांच्यासाठी ताकत उभी करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी लहू बालवडकर यांना दिले.

यावेळी लहू बालवडकर यांच्या वतीने पै. योगेश बालवडकर व पै. किरण बालवडकर यांच्या हस्ते प्रवीण दरेकर यांचा श्रींची मूर्ती देवून सन्मान करण्यात आला. एमपीएससी स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या स्पेस अँकॅडमी चे विद्यार्थी प्रशांत ढोरे (ACE&NT), स्नेहल मते(RFO), प्रगती कट्टे (RFO & NT), नरेंद्र शिंदे (NT), तेजस्विनी आव्हाड (RFO), तसेच पेस अकॅडमीचे डेप्युटी सीईओ सतीश पाटील यांचा सन्मान प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी सचिन दळवी, शिवम बालवडकर, पांडुरंग बालवडकर, दिपक चव्हाण, चेतन बालवडकर, आकाश बालवडकर, संतोष धनकुडे, संदीप तापकीर, अमित निकाळजे, स्वप्नील टकले, विनोद बालवडकर, राम बालवडकर, जीवन बालवडकर, विक्रम बालवडकर, राजेंद्र मांगडे, सुरज मांगडे, निखील बालवडकर, निखिल बालवडकर, अजित गवळी, प्रफुल्ल इखणकर, अनिकेत बालवडकर, अर्जून बालवडकर, तेजस बालवडकर, कौशल टंकसाळी, महेन्द काळे, राजेन्द् वर्मा, सुजित थिटे, लहू बालवडकर सोशल वेलफेअर चे कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  आरोग्य हीच संपत्ती' या तत्वावर आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणीवर भर : सुनील केदार