कोथरुडमधील सोसायटीत दिसला गवा सदृश्य जंगली प्राणी; स्थानिकांमध्ये खळबळ

0
slider_4552

पुण्यामधील कोथरुड भागातील महात्मा सोसायटीमधील नागरिकांसाठी आजची सकाळ आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. या सोसायटीमध्ये आज सकाळच्या सुमारास एक गवा सदृश्य प्राणी दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. प्रामुख्याने जंगलांमध्ये आढळून येणारा हा प्राणी लोकवस्तीमध्ये दिसून आल्याने गोंधळ उडाला.

कोथरुड सारखी दाट लोकवस्ती असणाऱ्या भागामध्ये हा प्राणी दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शहराच्या मध्य भागात गवा सदृश्य प्राणी कसा पोहचला यासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा स्थानिकांमध्ये रंगल्याचे चित्र दिसत आहे. या भागामध्ये सध्या या गव्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असल्याचंही सांगितलं जात आहे.

मानवी वस्तीत आलेल्या या जंगली प्राण्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करण्यात आला आहे. वन अधिकारी आल्यानंतर या प्राण्याची ओळख पटवता येऊ शकेल असं सांगितलं जातं आहे.

See also  प्रवाशांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी भारतीय रेल्वेची 24 तास कार्यरत राहणार या आयटी सेल ची उभारणी.