सेवेच्या माध्यमातून संवाद वाढवा : चंद्रकांत पाटील

0
slider_4552

कोथरूड प्रतिनिधी :-

भारतीय जनता पक्ष सेवाकार्यात नेहमीच आग्रेसर असतो, पण सेवेच्या माध्यमातून संवाद वाढवा असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. पुणे शहर भाजपा सेवा प्रकोष्टाची कार्यकारिणी आज घोषित झाली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवीजी अनासपुरे, सेवा प्रकोष्टाचे मुख्य संयोजक शेखर मुंदडा, सेवा प्रकोष्टाच्या पुणे शहर प्रमुख उल्का मोकासदार, पुणे शहर भाजपा चिटणीस अनिता तलाठी, कोथरूड मंडलाचे अध्यक्ष पुनित जोशी, प्रकोष्टाचे सहसंयोजक व आरोग्य विभाग प्रमुख चेतन शर्मा, सहसंयोजक व महिला बचत गट प्रमुख सुषमा कांबळे, रोजगार योजना प्रमुख अश्विनी ढोकणे, यांच्यासह सेवा प्रकोष्टाच्या कार्यकारिणीतील सदस्य उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, भारतीय जनता सेवाकार्यात आग्रेसर असतो. अतिशय कठीण परिस्थितीत ही सेवा कार्यात कमी पडत नाही. कोव्हिड १९ च्या काळात लॉकडाऊन मध्ये ही भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर उतरून काम करत होता. गरीब कुटुंबांना मोफत अन्नधान्य वाटप, वयोवृद्धांना औषधे पुरवणे, गावी परतणाऱ्यांसाठी मोफत बससेवा उपलब्ध करून देणे, बेरोजगार तरुणांसाठी मदतीचा हात पुढे करुन, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, असे अनेक उपक्रम राबविले. आता या सेवा कार्याच्या माध्यमातून संवाद वाढवावा. जेणेकरून संबंधित व्यक्तीशी आपले नाते निर्माण होऊ शकेल.

यावेळी कार्यकारणी सदस्यांशी संवाद साधून पुढील उपक्रमाचीही पाटील यांनी माहिती घेतली. तसेच, समाजोपयोगी सेवाकार्याचे उपक्रम मोठ्या संख्येने राबविण्याची सूचना ही त्यांनी यावेळी केली.

See also  मुळशी तालुक्यात नांदे येथे बर्ड फ्लू : पाच हजार कोंबड्या मारल्या