काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष पदी रमेश बागवे यांची फेरनिवड

0
slider_4552

पुणे :

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी च्या अध्यक्ष यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कमिटी मध्ये अनेक नेत्यांना स्थान देत सेक्रेटरी,जनरल सेक्रेटरी, प्रवक्ते आणि शहर अध्यक्ष यांची निवड घोषित केली आहे.

यात पुणे शहर अध्यक्ष पदी रमेश बागवे यांची फेर निवड करण्यात आली आहे तर प्रदेश समितिवर अनंतराव गाडगीळ यांची प्रवक्ते पदी निवड केली आहे. या शिवाय जनरल सेक्रेटरी पदावर अभय छाजेड़, रोहित टिळक , विरेन्द्र किराड़ यांना तर सेक्रेटरी पदावर दीप्ती चवधरी ,गोपाळ तिवारी यांची निवड करण्यात आली आहे.कार्यकारी नियोजन समितिवर उल्हास पवार यांची नियुक्ति करण्यात आली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चे जनरल सेक्रेटरी के सी वेणुगोपाल यांनी या नियुक्तया आज जाहिर केल्या.

या नव्या कार्यकारिणीत 18 उपाध्यक्ष, एक खजिनदार, 65 सरचिटणीस आणि 104 चिटणीस, सहा प्रवक्ते आहेत. या कार्यकारिणीत महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांची कन्या स्नेहल जगताप ह्या सर्वात तरुण आहेत. दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून प्रदेश कार्यकारिणीची राज्यातील नेतेमंडळींपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना प्रतीक्षा होती. तब्बल पाच महिन्यांनंतर पटोले यांची नवी कार्यकारिणी जाहीर झाली आहे. सोलापूर जिल्हा काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी धवलसिंह मोहिते पाटील तर सांगलीच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार विक्रम सावंत यांची नियुक्ती झाली आहे.

 

See also  जागतिक टेंडर काढून लशीच्या थेट खरेदीसाठी महापालिकांना राज्य सरकारच्या परवानगीची गरज नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार