नवी दिल्ली :
काँग्रेसमधीलनेतृत्व संकट आणि अंतर्गत वाद या पार्श्वभूमीवर पक्षामध्ये नवा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. शनिवारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये सर्व नेत्यांनी आपले मत मांडले. राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष करण्याची मागणी पुन्हा करण्यात आली. जवळजवळ 5 तास चाललेल्या या बैठकीमध्ये सर्व नेत्यांनी आपले म्हणणे मांडले. बैठकीत राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी करण्यात आली.
पक्ष जी जबाबदारी देईल, ती संभाळण्यास तयार असल्याचं राहुल गांधी यावेळी म्हणाले. त्यानंतर बैठकीतील नेत्यांनी टाळ्या वाजवल्या. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे राहुल गांधी पुन्हा एकदा अध्यक्षपद संभाळतील, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.