मॅक न्यूज :

रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रात पर्यटन करण्यासाठी गेलेल्या पुण्यातील काही पर्यटक बुडाल्याची घटना आज शुक्रवारी घडली. या घटनेमध्ये सहा पर्यटन बुडाले असून त्यापैकी तीन जणांचा दुर्दैवी रित्या मृत्यू झाला आहे. त्यातील तीन पर्यटकांना स्थानिकांच्या मदतीने वाचविण्यात आले असून या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दापोली पोलिसांनी धाव घेतली .

एकूण 14 पर्यटक भेटण्यासाठी दापोली तालुक्याला गेले होते. हे पर्यटक पुण्यातील औंध येथे कामाला असल्याचे  समजते. त्यामधील विकास श्रीवास्तव (रा.कोथरूड), अक्षय राखेलकर (रा. शाहूनगर), मनोज गवांडे (रा. धानोरी), उबेज खान (रा. हडपसर),  रोहित पलांडे (रा. पिंपरी), निहाल चव्हाण (रा. येरवडा) हे सर्वजण पोहण्यासाठी पाण्यात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. तेव्हा जवळपास असणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या हे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी पाण्यात पडत असणाऱ्या सहा तरुणांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून केवळ रोहित पलांडेे, शितल चव्हाण, उबेल खान यांना वाचविण्यात यश आले. वाचवण्यात आलेल्या तीन तरुणांना शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे.

परंतु उर्वरित तीन जण सापडत नव्हते त्याचा शोध स्थानिकांनी घेतला दरम्यान सदर घटनेची बातमी पोलिसांना देण्यात आली. बातमी कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बेपत्ता झालेल्या पर्यटकांचा शोध घेण्यात आला. काही वेळाने बेपत्ता झालेल्या तिघांचे मृतदेह सापडले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

See also  राज्य सरकारचा पालकांना दिलासा खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात करण्याचा जीआर काढला.