पुण्यात शनिवार-रविवार केवळ अत्यावश्यक सेवा व पार्सल सेवा सुरू : महापौर

0

पुणे :

कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसत आहे. आकडेवारीनुसार शिथिलता मिळाल्यानंतर पुण्यातील मार्केटमध्ये, गडांवर, मॉल, दुकानांमध्ये गर्दी ओसांडून वाहताना दिसली. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

पुणे मनपा हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहतील. तर रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून शनिवार-रविवार केवळ पार्सल सेवा देता येईल, असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.

पुण्यामध्ये सर्व काही सुरू झालं. त्यामुळे इतके दिवस घरी बसलेले पुणेकर बाहेर निघू लागले आहेत. त्यामुळे गर्दीही मोठ्या प्रमाणात वाढू लागली. मात्र कोरोनाची तिसरी लाट यायला ही गर्दी पुरेशी आहे. संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

कोरोना संकटाच्या काळात अनेकांनी आपले नातेवाईक, मित्र, जवळच्या व्यक्तींना गमावलं. काही लहानग्यांनी तर आपले आई-वडील अशा दोघांनाही गमावलं आहे. अशा कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी पुणे प्रशासनानं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई-वडिलांच्या संपत्तीवर मुलांचा हक्क असणार आहे.

https://twitter.com/mohol_murlidhar/status/1405882247102681088?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1405882247102681088%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

See also  अ‍ॅमिनिटी स्पेस भाडेकराराने देण्याचा भाजपच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेसची साथ