पाषाण :
कोरोना पार्श्वभूमीवर प्रत्येक जण काही ना काही नागरिकांना सेवा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीमध्ये पाषाण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सात वर्ष पूर्ण झाले म्हणून त्याचे निमित्त साधून पाषाण येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने पाषाण सुस रोड परिसरातील रिक्षा चालक बांधवांना मास्क आणि सॅनिटायझर चे वाटप करून सेवा दिन साजरा करण्यात आला.
या वेळी स्विकृत सदस्य सचिन पाषाणकर यांनी बोलताना सांगितले की, भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या देशात सरकार चालविले आहे. त्याचे निमित्त साधून पंतप्रधानांच्या कार्यामध्ये सहभाग नोंदवून कोरोनाच्या परिस्थिती मध्ये देखील नागरिकांना सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी सॅनिटायझर आणि मास्क चे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे.
यावेळी स्विकृत सदस्य सचिन पाषाणकर, राजेंद्र पाषाणकर, उत्तम जाधव, संतोष वेल्हाळ, विजय सुपेकर, निरज जेजुरकर, कौशल टंकसाळी, मंगेश आंबरुळे उपस्थित होते. या वेळी निरज जेजुरकर यांचे मौल्यवान सहकार्य लाभले.