पुण्यातील ड्रायव्हिंग स्कूल चालकांचे लॉकडाऊन मुळे मोडले कंबरडे : व्यवसाय सुरू करू देण्याची मागणी.

0
slider_4552

पुणे :
पुण्यातील ड्रायव्हिंग स्कूल चालकांचे लॉकडाऊन मुळे कंबरडे मोडले असून, आता व्यापाऱ्यांनंतर त्यांनीही आम्हाला आमचे व्यवसाय १ जून पासून सुरु करू द्यात या साठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना कळकळीची विनंती करणारे पत्र धाडले आहे. महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे, महासचिव यशवंत कुंभार उपाध्यक्ष अनंत कुंभार सचिव निलेश गांगुर्डे, कोषाध्यक्ष निखिल बोराडे यांनी हे पत्र पाठविले आहेया पत्रात असे म्हटले आहे कि, महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकार मान्य ड्रायव्हिंग स्कूल ड्रायव्हिंग या प्रशिक्षण देणाऱ्या सर्व संस्था गेल्या दोन महिन्यापासून शंभर टक्के बंद आहेत. त्यामुळे सरकारमान्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांचे फार मोठे नुकसान होत आहे. ड्रायव्हिंग स्कूल संचालकांना सदर संस्थे शिवाय अन्य उत्पन्नाचे साधन नाही लॉक डाऊन कालावधीमध्ये ड्रायव्हिंग प्रशिक्षक ऑफिस स्टाफ क्लास रूम प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षक या सर्वांना घर बसून पगार देणे यापुढे शक्य होणार नाही.

तसेच महानगरांमध्ये असलेली ड्रायव्हिंग स्कूल भाडेतत्त्वावर असून त्यासाठी खूप मोठे भाडे आम्हाला मोजावे लागत आहे. मागील लोक डाऊन व आत्ताचे लोक डाऊन या सर्वांमुळे ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे कंबरडे मोडले आहे. आम्हाला राज्य शासन अथवा भारत सरकार यांचे कडून कुठल्याही प्रकारचे अनुदान किंवा मदत आम्हाला अद्याप मिळालेली नाही.

त्यामुळे महोदय आपणास विनंती, सरकार मान्य महाराष्ट्र राज्यातील मोटार ड्रायव्हिंग स्कूल प्रशिक्षण संस्थांना 1 जून 20 21 पासून सुरु करण्यास परवानगी मिळावी. सर्व ड्रायव्हिंग स्कूल कडून सोशल डिस्टंसिंग पालन करून कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक शिकाऊ उमेदवाराचे तापमान चाचणी यंत्राद्वारे तपासणी करून मास्क व सॅनिटायझर चा वापर करून चा वापर करून प्रशिक्षण दिले जाईल. कार्यालयांमध्ये अथवा प्रशिक्षण देणाऱ्या गाडी मध्ये एका वेळी एकच उमेदवाराला प्रवेश देऊ. एका उमेदवाराचे प्रशिक्षण झाल्यानंतर संपूर्ण गाडी पुन्हा निर्जंतुक करून घेतलेले आहेत. महाराष्ट्र शासनाने कोरोना च्या पार्श्वभूमीवर ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आम्ही सर्व पालन करून अशी ग्वाही आम्ही आपणास देतो. तरी सरकारमान्य मोटर ड्रायविंग स्कूल संचालकांना व प्रशिक्षण देणाऱ्या ड्रायव्हिंग स्कूल संस्थांना एक जून 20 21 पासून सुरु करण्यास परवानगी मिळावी

See also  पुण्यात तंत्रज्ञान आणि संशोधनातील प्रगतीला वाव असून स्टार्टअप साठी पुण्याचे वातावरण पोषक : उद्योग मंत्री पियुष गोयल