कोव्हॅक्सिनचे उत्पादक भारत बायोटेक कंपनीने आपली लस उत्पादन क्षमता वार्षिक 70 कोटी डोसपर्यंत वाढवली

0
slider_4552

हैदराबाद :

भारतीय बनावटीची लस कोव्हॅक्सिनचे उत्पादक भारत बायोटेक कंपनीने आपली लस उत्पादन क्षमता वार्षिक 70 कोटी डोसपर्यंत वाढवली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे ती जागतिक स्तरावर सर्वाधिक निष्क्रिय व्हायरस लसीची निर्मिती करणारी कंपनी बनली आहे. एवढे नव्हे तर कंपनीने लस निर्मितीसाठी अमेरिकेवरील अवलंबित्वही संपुष्टात आणले आहे. लसनिर्मितीसाठी लागणारा कच्चा माल स्थानिक पुरवठादारांकडून खरेदी करत संपूर्णपणे स्वदेशी लस भारतीयांना उपलब्ध केली आहे.

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीची कारोना विषाणूविरुद्ध 78 टक्के एफिकसी असून 100 टक्के सक्सेस रेट आहे. याशिवाय ही लस कोरोनाच्या डबल म्युटंट B.1.617 वरही तेवढीच प्रभावी असल्याचे आढळले आहे. भारत बायोटेकने आपल्या हैदराबाद येथील जिनोम व्हॅलीतील युनिटमध्ये तसेच बंगळुरूतील बायोवेट प्रायव्हेट लिमिटेड या अंगभूत कंपनीत सुविधा उभारून लसीचे उत्पादन वाढवले आहे.

भारत बायोटेकने असेही म्हटले आहे की, लसीच्या विनाअडथळा उत्पादनवाढी त्यांनी केवळ व्यावसायिक पातळीवर कोव्हॅक्सिन निर्मितीला सहायक अ‍ॅल्जेल-आयएमडीजीचा मुख्य घटक अ‍ॅगोनिस्ट आयएमडीजीचे संश्लेषण आणि उत्पादन यशस्वीपणे केले नाही, तर औषधांच्या उत्पादनासाठी इंडियन इम्युनोलॉजिकल लिमिटेडशी हातमिळवणीही केली आहे.

देशात ही पहिली घटना आहे जिथे नवीन सहायक कंपनी शोधून आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यात आले आहे. तंत्रज्ञान हस्तांतरणाची प्रक्रियाही जोरदार सुरू आहे आणि आयआयएलकडे व्यावसायिक स्तरावर आणि बायोसाफ्टी कंटेन्ट अंतर्गत निष्क्रिय व्हायरल लसी तयार करण्याची क्षमता व कौशल्यदेखील आहे. कोव्हॅक्सिनच्या निर्मितीसाठी भारत बायोटेकने कच्चा माल, पॅकिंग मटेरियल आणि सिंगल यूज वस्तूदेखील सुरक्षित केल्या आहेत. भारत बायोटेकने असेही म्हटले आहे की, ते आता इतर देशांमध्ये अशा भागीदारांच्या शोधात आहेत, ज्यांच्याकडे निष्क्रिय व्हायरस लसीचे व्यावसायिक उत्पादन करण्याचे कौशल्य आहे.

कोव्हॅक्सिनची भारतातील खासगी बाजारातील किंमत काय असू शकते हे सांगताना कंपनीने म्हटले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठांची किंमत आणि युरोपियन युनियनअंतर्गत विविध देशांच्या सरकारला पुरवठा (आपत्कालीन वापरासाठी) प्रति डोस 15 ते 20 डॉलर ठरवण्यात आला आहे. कोव्हॅक्सिनला आतापर्यंत मेक्सिको, फिलिपाइन्स, इराण, पॅराग्वे, ग्वाटेमाला, निकारागुवा, गयाना, व्हेनेझुएला, बोट्सवाना, झिम्बाब्वे या देशांत पाठवण्यात आले आहे. तर अमेरिका आणि युरोपातील 60 देशांची बोलणी सुरू आहे.

See also  स्पायवेअरचा उपयोग करून हेरगिरी करणे हे वैयक्तिक स्वातंत्र्याचे उल्लंघन : सुप्रीम कोर्ट

कंपनीने म्हटले आहे की, नव्याने बनवलेल्या बीएसएल-3 सुविधांच्या उपलब्धतेमुळे कोव्हॅक्सिनचे उत्पादन कमी कालावधीत वाढविण्यात आम्ही सक्षम आहोत. “निष्क्रिय लस अत्यंत सुरक्षित असतात परंतु त्यांचे उत्पादन करणे अत्यंत जटिल आणि महागडे असते. परिणामी जिवंत विषाणूच्या लसींच्या तुलनेत उत्पादन कमी होते. लस उत्पादनाची क्षमता वाढविणे ही एक दीर्घ आणि कंटाळवाणी प्रक्रिया आहे, त्यासाठी लाखो रुपये आणि कित्येक वर्षांची गुंतवणूक आवश्यक असते. आमच्या लसीने उत्पादन, चाचणी आणि वितरण याविषयीचे प्रोटोकॉल पूर्ण केले आहेत. जे डब्ल्यूएचओ, भारतीय आणि इतर नियामक प्राधिकरणांच्या कसोटीवर खरे उतरले आहे.