ऑक्सिजन पुरवठा कमी पडू लागल्या मुळे आरोग्य सेवेत गोंधळ

0

औंध :

पुण्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा अधिक प्रमाणात वाढत आहे. रुग्णाची संख्या वाढल्याने आरोग्याच्या सोयी आणि ॲाक्सिजनचा पुरवठा कमी पडू लागला आहे. यामुळे आता एक धक्कादायक माहिती पुढं आलीय. काही रुग्णालयांनी ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्णांना दाखल करून घेणे थांबविले आहे. या प्रकरणावरून आरोग्य सेवेत गोंधळ निर्माण झाला आहे.

अगोदरच कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यात या रुग्णावर उपचार करण्यासाठी सुविधा कमी पडू लागल्या आहेत. पुणे शहरात ॲाक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या ॲाक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णालयांवर कोरोना रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्याची वेळ आली होती. मात्र अडचण असतानाही ऑक्सिजन मिळत नसल्याने आता शहरातील छोट्या रुग्णालयांनी कोरोना रुग्ण दाखल करून घेणे थांबविले आहे.

दरम्यान, ऑक्सिजन अभावी रुग्णाचे व्यवस्थापन करण्यास अडचण निर्माण झालीय. वारंवार मागणी करूनही सहानी, सत्रमदास, रायगड अशा ऑक्सिजन सप्लायर कडून संध्याकाळी सहा नंतर सप्लाय करणे बंद होते. सध्या ऑक्सिजनची गरज पाहता ऑक्सिजन पुरवठा 24 तास सुरू ठेवणे आवश्यक आहे.

संध्याकाळी सहानंतर ऑक्सिजन मिळत नसल्याने पुरवठा कमी पडत आहे असे डीलर ने सांगितले. ऑक्सीजन बनण्यासाठी आवश्यक लिक्विड मिळत नसल्याने ऑक्सीजन चे सिलेंडर मिळत नाहीत असे, एम्स हॉस्पिटल औंध येथील ऑक्सीजन पुरवठादार भंडारे यांनी सांगितले.

यावेळी एम्स हॉस्पिटल औंध चे मॅनेजिंग डायरेक्टर गोकुळ गायकवाड यांनी मॅक न्यूज शी बोलताना सांगितले की, हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या वाढत असताना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडणे ही फार गंभीर बाब आहे. त्यामुळे पेशंटवर उपचार करणे अवघड होत आहे. रात्र रात्रभर फोन करून ऑक्सिजन पुरवठा कुठून होईल याची वाट पाहावी लागत आहे. प्रशासनाने ऑक्सिजनचा पुरवठा कसा वाढेल याचे नियोजन केले गेले तर हॉस्पिटल व्यवस्थापनास येणाऱ्या पेशंटला व्यवस्थित उपचार करून घेणे सोपे जाईल. रुग्णांवर उपचार करण्यास हॉस्पिटल व्यवस्थापन पूर्णपणे सज्ज असून ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर औषधांचे सरकारने व्यवस्थित नियोजन लावून दिल्यास कोणतीच अडचण येणार नाही.

See also  औंध एम्स हॉस्पिटल मधील लसीकरणामुळे नागरिकांना दिलासा.