बाणेर येथे आज होणार पर्यावरण प्रेमी नागरिकांतर्फे चिपको आंदोलन… जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन..

0
slider_4552

बाणेर :-

बाणेर बालेवाडी परिसरातून वाहत असलेल्या मुळा नदीच्या काठी नदी सुधार प्रकल्प अंतर्गत कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येणार आहे. या वृक्ष तोडीस विरोध म्हणून बाणेर परिसरामध्ये पर्यावरण प्रेमी नागरिकांतर्फे रविवारी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता हजारो नागरिकांच्या उपस्थितीत चीपको आंदोलन करण्यात येणार आहे. बाणेर येथील कलमाडी हायस्कूल पासून ते राम नदी व मुळा नदी संगम पर्यंत हे चिपको आंदोलन करण्यात येणार आहे.

बाणेर बालेवाडी बाजूच्या विरुद्ध बाजूस असणाऱ्या वाकड पिंपळे निलख या ठिकाणी नदीमध्ये भरव टाकून नदी सुधार प्रकल्पाचे काम जोरदार पद्धतीने चालू आहे. या नदीमध्ये भराव टाकल्यामुळे बाणेर बालेवाडी परिसराला मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या कामास बाणेर बालेवाडी परिसरातून नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. खासदार मेधा कुलकर्णी यांनी देखील प्रत्यक्ष भेट देऊन हे काम थांबवण्याच्या सूचना केल्या होत्या. अनेक पर्यावरण प्रेमी नागरिकांनी नदीमध्ये भराव टाकण्याचे काम थांबवण्यासाठी आपापल्या परीने प्रशासनास तक्रारी केल्या आहेत. परंतु तरीदेखील मोठ्या प्रमाणात नदीमध्ये भर टाकून हे काम सुरू आहे.

पर्यावरण प्रेमी नागरिकांमार्फत बाणेर बालेवाडी परिसरामध्ये विविध रहिवासी भागांमध्ये जाऊन नागरिकांमध्ये पर्यावरण संदर्भात जनजागृती करून तसेच भविष्यात उद्भवणारे धोके नागरिकांना सांगून या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन पर्यावरण प्रेमी नागरिकांमार्फत करण्यात येत आहे.

सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, इनोव्हेटर आणि शिक्षणसुधारक सोनम वांगचूक देखील घेणार आंदोलनात सहभाग.

 

 

See also  पुण्यात शनिवार-रविवार केवळ अत्यावश्यक सेवा व पार्सल सेवा सुरू : महापौर