पुणे :
सोशल मीडियावर रील्स स्टार मोठ्या प्रमाणात वाढत्या कारणाने बेटिंग ॲप्स स्वतःच्या फेक लाइफस्टाइल दाखवून लोकांना पैसे जुगार खेळून डबल करा तसेच मोठ्या गाड्या घेण्याचे स्वप्न दाखवून लोकांची फसवणूक केली जाते आहे. याबाबत संबंधितावर सायबर क्राईम अंतर्गत कारवाई करण्याात यावी असे निवेदन मनसेच्या वतीने पोलिसांना देण्यात आले आहे.
या सर्व फेक गोष्टीमुळे सामान्य नागरिक भरकटला जात आहे, व त्याला आर्थिक नुकसानी मोठ्या प्रमाणात सोसावे लागत आहे. यामुळे अशा प्रलोभनांना बळी न पडता नागरिकांची जनजागृती आवश्यक आहे. अशा फसव्या रील करणाऱ्यांवर कारवाई केली जावी यामुळे या रीलस्टार वर वचक बसेल असे मत गौरव खेडेकर यांनी व्यक्त केले.
या बद्दल डेक्कन पोलिस चौकीत निवेदन देऊन तक्रार करण्यात आली. मनसेचे छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे विभाग उपाध्यक्ष गौरव खेडेकर यांनी हे निवेदन डेक्कन पोलिस चौकीत दिले. तसेच लवकरात लवकर ह्या खोट्या रिल्स स्टार्स वर कारवाई करावी व त्यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट स्थगित करावे असे जेणेकरून सामान्य नागरिकांची फसवणूक होणार नाही असे निवेदन देण्यात आले आहे.