३९ जणांचा शपथविधी; २५ नवे चेहरे, ११ जणांना डच्चू, पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी

0
slider_4552

मुंबई :

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षीत विस्तार आज संपन्न झाला. नागपुरातील राजभवनात दिमाखदार सोहळ्याचं आयोजन केलं होतं. उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्याच्या एक दिवस आधी महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. महायुतीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर १० दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तार संपन्न झाला.

महायुतीच्या ३९ आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपच्या सर्वाधिक १९ जणांचा समावेश आहे. तर शिवसेनेच्या ११, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ जणांचा समावेश आहे. गेल्या मंत्रिमंडळातील काही जणांना डच्चू देत यंदा महायुतीमधील तिन्ही पक्षांनी मिळून २५ नवे चेहरे दिले आहेत.

*शपथ घेतलेल्या आमदारांची संपूर्ण यादी-*

१. चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)

२. राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)

३. हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी)

४. चंद्रकांत पाटील (भाजप)

५. गिरीश महाजन (भाजप)

६. गुलाबराव पाटील (शिवसेना)

७. गणेश नाईक (भाजप)

८. दादा भुसे (शिवसेना)

९. संजय राठोड (शिवसेना)

१०. धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)

११. मंगलप्रभात लोढा (भाजप)

१२. उदय सामंत (शिवसेना)

१३. जयकुमार रावल (भाजप)

१४. पंकजा मुंडे (भाजप)

१५. अतुल सावे (भाजप)

१६. अशोक उईके (भाजप)

१७. शंभुराज देसाई (शिवसेना)

१८. आशिष शेलार (भाजप)

१९. दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस)

२०. अदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)

२१. शिवेंद्रराजे भोसले (भाजप)

२२. माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस)

२३. जयकुमार गोरे (भाजप)

२४. नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी काँग्रेस)

२५. संजय सावकारे (भाजप)

२६. संजय शिरसाट (शिवसेना)

२७. प्रताप सरनाईक (शिवसेना)

२८. भरत गोगावले (शिवसेना)

२९. मकरंद पाटील (राष्ट्रवादी)

३०. नितेश राणे (भाजप)

३१. आकाश फुंडकर (भाजप)

३२. बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)

३३. प्रकाश आबिटकर (शिवसेना)

३४. माधुरी मिसाळ (भाजप)

३५. आशिष जैस्वाल (शिवसेना)

३६. पंकज भोयर (भाजप)

३७. मेघना बोर्डीकर (भाजप)

३८. इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस)

३९. योगेश कदम (शिवसेना)

*कोणकोणते नवे चेहरे?*

See also  लॉकडाऊन करायचा का ? जनतेने ठरवावे : मुख्यमंत्री.

चंद्रशेखर बावनकुळे, गणेश नाईक, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अशोक उईके, आशिष शेलार, दत्तात्रय भरणे, शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवळ, संजय सावकारे, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, मकरंद पाटील, नितेश राणे, आकाश फुंडकर, बाबासाहेब पाटील, प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ, आशिष जैस्वाल, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर, इंद्रनील नाईक.

*कोणाकोणाला डच्चू?*

सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावित, रविंद्र चव्हाण, सुरेश खाडे, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल पाटील, संजय बनसोडे.