बाणेर पॅन कार्ड रोड येथे अतिक्रमण कारवाई…

0
slider_4552

बाणेर :

बाणेर येथील पॅन कार्ड क्लब रस्ता येथील मुरकुटे उद्यान चौक, हॉटेल कॉर्नर लॉन्ज, इंडियन कल्चर होटेल, हॉटेल सिग्नेचर आणि वेस्ट रोज सोसायटी समोरील फ्रंट मार्जिन, अनधिकृत पत्राशेड व बांधकामावर अतिक्रमण कारवाई करण्यात आली.

अनधिकृत बांधकाम क्षेत्रावर बांधकाम विकास विभाग झोन ३ यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी व पार्किंगच्या समस्या भेडसावत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याची सांगितले जात आहे. सदर कारवाई मधे सुमारे २५,६३०.०० चौ.फूट विनापरवाना क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे.

सदर कारवाई पुणे महानगरपालिकेचे अधिक्षक अभियंता, बांधकाम विभाग झोन क्र.३ चे कार्यकारी अभियंता यांचे मार्गदर्शनाखाली उप अभियंता, कनिष्ठ अभियंता व इतर स्टाफ, सहा. पोलिस निरीक्षक यांच्या पथकाने व एक जेसीबी, एक गॅस कटर, दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने पत्राशेड विट बांधकामातील एकूण क्षेत्रावर कारवाई पूर्ण केली.

See also  पाषाण-सूस रस्त्यावरील पुलाच्या उद्घाटनास स्थानिकांचा विरोध