ननवरे ब्रिज बाणेर ते सुस रोड वरदायिनी सोसायटी पर्यंत चार चाकी चालकाचा कहर…

0
slider_4552

बाणेर :

ननवरे ब्रिज बाणेर ते सुस रोड वरदायिनी सोसायटी पर्यंत चार चाकी ग्लॉस्टर (एम एच १२ डब्लू एच ९११२) चालकाचा कहर. ननवरे ब्रिज येथे वाहनाला धडक बसल्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत चार ते पाच वाहनांना धडक देत वरदान सोसायटी पर्यंत चार चाकी चालकाने केला कहर.

बाणेर येथील एका सोसायटीत केअर टेकर म्हणून असणारे ऋत्विक शाम बनसोडे (वय 19 मुळ गाव उमरगा) त्यांनी ननावरे ब्रिज येथे एका वाहणाला धडक दिली. तेथून पळ काढत असताना पुढे असणाऱ्या वाहनांना धडक देत ननावरे ब्रिज खाली स्कूल बसला धडक दिली.

ननवरे ब्रिज खाली त्याची गाडी थांबलेली असताना नागरिकांनी उतरण्याचा आग्रह केला पण तो उतरत नसल्याने त्याच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. पुढे सूस बाजूने निघाल्यावर एक दोन वाहनांना धडक दिली व वरदानी सोसायटी जवळ एका क्रियेटाला धडक बसून ती चार चाकी अखेर पलटी झाली. ग्लॉस्टर थैमान संपला, व थांबलेली गाडी पाहून पाहणाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. चालकाने मद्य प्राशन केले असल्याचे लक्षात येत आहे, असे नागरिकांनी सांगितले.

पोलिसांनी ऋत्विक बनसोडे याला ताब्यात घेतला असून त्याची मेडिकल चेकअप साठी पाठवण्यात आले असल्याचे सांगितले आहे. अंदाजे त्याने चार ते पाच वाहनांना धडक दिली असल्याचे पोलिसांचे सांगणे आहे.

पाषाण येथे ५.30 वा अपघात झाला असून नमूद चार चाकी गाडीचालक याला ताब्यात घेण्यात आलेले असून वैद्यकीय तपासणीकरिता पाठवलेले आहे. कोणतीही जीवित हानी झाली नाही. नमूद अपघात झालेले फिर्यादी बाणेर पोलीस ठाणेस असून फिर्याद घेण्याचं काम चालू आहे. एकूण 3-4वाहनांना धडक दिलेली आहे. घटनास्थळी शांतता आहे.

See also  शिवाजीनगर येथे कामगार भवनाची पायाभरणी