बाणेर :
बाणेर येथील भारतीय जनता पक्ष नेते गणेश कळमकर यांची भा ज पा शहर सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी नियुक्ती पत्र देऊन नुकतीच त्यांची निवड केली. यावेळी पुनित जोशी, प्रल्हाद सायकर आदी उपस्थित होते.
गणेश कळमकर यांनी याआधी देखील भारतीय जनता पक्षात विविध पदांवर कामे केली आहेत. भारतीय जनता पक्ष पुणे शहर उपाध्यक्ष, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांची कोथरूड मतदार संघ संयोजक पदी निवड करण्यात आली होती. बाणेर, बालेवाडी, पाषाण परिसरात भारतीय जनता पक्षास मिळालेल्या भरघोस मतदानात त्यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांचे ते पती आहेत.
गणेश कळमकर ( भा ज पा पुणे शहर सरचिटणीस ) :भारतीय जनता पक्षाने वेळोवेळी माझ्यावर विश्वास ठेवून मला अनेक पदांवर काम करण्याची संधी दिली आहे. राष्ट्र प्रथम या भावनेतून मी पक्षाचा विचार सर्वत्र पोहचवत आहे. यापुढील काळात देखील सर्वांना एकत्र घेऊन शहराचा विकासाची कामे व पक्ष संघटन वाढवण्यावर माझा भर राहील.