पुणे :
अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय
अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज यांच्या
अध्यक्षतेखाली बापूसाहेब ज्ञा.कंद यांची हवेली
तालुका अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात
आली.
बापूसाहेब कंद यांना अखिल भारतीय वारकरी
मंडळाच्या पदाधिकार्यांच्या हस्ते निवडीचे पत्र
देण्यात आले. हवेली तालुक्यात एक उत्तम उद्योजक
आणि अध्यात्माचे संस्कार जनमानसात रुजवणारा
एक वारकरी म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती आहे.
त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद,
खाण क्रशर संघटनेचे सर्व पदाधिकारी, पुणे जिल्हा
परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, कमल बाग
सोसायटीचे चेअरमन तथा उद्योजक संतोष देशमुख
आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून
तालुक्यात अध्यात्माचे संस्कार रुजवण्यासाठी
यापुढील काळात विविध सामाजिक बांधिलकीचे
उपक्रम राबवणार असल्याचे बापूसाहेब कंद यांनी
सांगितले.