बाणेर :
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत आदित्यच्या मुला मुलींनी सुवर्ण व कांस्यपदक पटकावले.
दिनांक 16 ऑगस्ट रोजी झालेल्या बॅडमिंटन खेळामध्ये फर्ग्युसन कॉलेज पुणे विरुद्ध खेळताना आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
या खेळामध्ये आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलींच्या 19 वयोगटाच्या विद्यार्थिनींनी बॅडमिंटन या खेळात जिंकून पारितोषिक पटकावले . कुमारी दिव्यांशा वहाळ, रिधिमा शेरावत, दनिका पलसुले, श्रेया चौधरी, मृणाल सोनार यांनी फर्ग्युसन कॉलेज पुणे विरोधात खेळताना २-० च्या बढतीने सुवर्ण पदक पटकावत बाजी मारली.
दिनांक 16 ऑगस्ट रोजी झालेल्या बॅडमिंटन खेळात डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल विरुद्ध खेळताना आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
या खेळामध्ये आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुले 19 वयोगटाच्या विद्यार्थ्यांनी बॅडमिंटन या खेळात जिंकून कांस्यपदक पटकावले . कु. सिद्धांत कोल्हाडे अल्हाड देशकर , पारितोष साकोरकर, अहान वायकर, यांनी डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल विरोधात खेळताना २-० च्या बढतीने कांस्य पदक पटकावत बाजी मारली.