पुढील 24 तासात अतिवृष्टीच्या अंदाजामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकाना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा

0
slider_4552

पिंपरी चिंचवड :

पुणे शहराजवळील खडकवासला धरण 80%,पानशेत 94% आणि टेमघर 78% एतक्या क्षमतेने भरलेले आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड शहराशी संलग्न असलेले पवना धरण ৪4 टक्के क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे पुढील पावसाळा कालावधीसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी सतर्क आणि दक्ष राहणे आवश्यक आहे.

दि.28 जुलै च्या रात्री आणि 29 जुलैच्या पहाटे अतिवृष्टीचा अंदाज दिल्यामुळे पुढील दोन दिवस मुठा आणि पवना नदीपात्रात पर्जन्यामानानुसार आणि येव्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग होण्याची शक्यता आहे.सद्यस्थितीत खड़कवासला आणि पवना धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरु असून पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी/ जास्त करण्यात येईल.

उपरोक्त विषयानुसार पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी मुठा नदीपात्र आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी पवना नदीपात्रातील निषिद्ध क्षेत्रामथ्ये उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आलेले आहे.

See also  महाराष्ट्रात शासकीय रुग्णालयांमध्ये आता ‘नो रेफरन्स’ – आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत