बाणेर :
पुणे महानगरपालिकेच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या कामासाठी 5 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीत बाणेर ते परिहार चौक या मार्गात तात्पुरता बदल करण्यात येणार आहे.
पुणे वाहतूक पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, आयटीआय रोडवरील विस्तृत पाइपलाइनच्या कामामुळे वाहतूक प्रवाहात तात्पुरता बदल करणे आवश्यक आहे. पाइपलाइन टाकण्याची क्रिया रस्त्याच्या मध्यभागी केंद्रित आहे.त्यामुळे 5 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीत वाहतूकीत बदल केले जातील.
बाणेर फाट्यावरून परिहार चौकाकडे जाणार्या वाहनधारकांना बाणेर फाट्यावर डावीकडे वळावे, सीझन्स रोडवरील ईश्वर मेडिकलपासून उजवे वळण घ्यावे, त्यानंतर अविक पॉलीकेम येथे दुसरे उजवे वळण घ्यावे, असा सल्ला देण्यात आला आहे. परिहार चौकात जाण्यासाठी ते आयटीआय रोडवरून सरळ पुढे जाऊ शकतात.