सोमेश्वरवाडी :
सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट सोमेश्वरवाडी, विठ्ठल सेवा गणेशोत्सव मंडळ (एक गाव एक गणपती), विठ्ठल रुक्मिणी मंदिर सोमेश्वरवाडी, राजे शिवराय प्रतिष्ठान पेठ जिजापूर पाषाण, सकल हिंदू समाज यांच्या वतीने आणि सचिन दळवी मित्रपरिवार यांच्या सौजन्याने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा ३५० वा शिवराज्याभिषेक दिवस (हिंदू साम्राज्य दिन उत्सव) सोमेश्वरवाडी (पेठ जिजापूर), पाषाण, पुणे – ०८ येथे सोमवार ०५ जून २०२३ रोजी सायंकाळी ५:३० वाजता साजरा करण्यात येणार आहे.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले जाईल. तसेच ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांचे व्याख्यान शिवराज्याभिषेक दिवस (हिंदू साम्राज्य दिन उत्सव) या कार्यक्रमानिमित्त आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला सर्व शिवभक्तांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे.