पाषाण, सूस आणि पुण्यातील काही भागात गारांसह जोरदार पाऊस..

0
slider_4552

पाषाण :

पुणे शहरासह उपनगरात जोरदार पाउस काल पडला. पाषाण, सूस रस्ता, खडकी, कोथरूड, औंध, वाकड, बाणेर, बालेवाडी, सुस भागात मेघ गर्जने सह जोरदार पाउस पडला.

पुण्याला पुढील चार दिवस ‘येलो अलर्ट’ हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला आहे. दिवसा उन्हाचे चटके आणि सायंकाळी ढगाळ हवामान होताच पडणारा पाऊस अशी स्थिती सध्या पुण्यात अनुभवायला मिळत आहे.

अचानक येणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहे. काही ठिकाणी गारांचा पाउस झाला असून झाडे देखील पडली. वारा, विजांचा कडकडाट, आणि गारा असा पाउस भीतीदायक होता. त्यात लाईट गेल्याने नागरीकांना बराच काळ अंधारात राहावे लागले.

See also  सोमेश्वरवाडी, औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण परिसरात महाशिवरात्र मोठया उत्साहात संपन्न