मुंबई :
राज्यातील लोकप्रिय असणाऱ्या दही हंडी दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दंहीहंडीबाबत आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दहीहंडीचा समावेश खेळामध्ये करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
त्यांच्या या निर्णयामुळे दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या 18 ऑगस्ट रोजी विधानभवनात दहींहंडीला खेळाचा दर्जा देण्याबाबतच्या निर्णयाची घोषणा करणार आहेत. प्रो कब्बडी प्रमाणे प्रो दहीहंडी सुरू केली जाणार आहे. दहीहंडी आता एक दिवस नाही तर 365 दिवस खेळली जाणार आहे.
राज्याच्या क्रिडा विभागाची अत्यंत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत दहीहंडीचा समावेश खेळामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्या 18 ऑगस्ट रोजी या संबंधीत जीआर काढला जाणार असल्याची माहिती क्रिडा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.